फुलोरा – एक वेगळी कल्पना !

पालक हेच शिक्षक

‘ शिकणं ‘ ही प्रेरणा नैसर्गिक आहे. लहान मुलांना आनंदानं शिकण्यासाठी आपण वेगवेगळ्या वाटा दाखवून त्यांना आतून उमलून येण्यासाठी मदत करायला हवी, या विचारातून ‘ फुलोरा ‘ सुरु झाली. बघता बघता आज फुलोराला पंचवीस वर्षं झाली !

first day

शाळेचा पहिला दिवस – ११ जून १९९०

 

फुलोराची काही वैशिष्ट्ये…

  • मातृभाषेतून शिक्षण
  • अनुभवातून आणि कृतीतून शिक्षण
  • सृजनशीलता, निर्मिती यासाठी प्रोत्साहन
  • निसर्गातील बदल, भेटणारी माणसं, परिसरात घडणाऱ्या घटना या सर्वांकडे कुतूहलानं पाहण्याची संधी
  • विविध वैशिष्ट्यपूर्ण सहली
  • खेळातून शिक्षण, मैत्रीला महत्व, सहकाराची पेरणी पण स्पर्धा नाही
  • २० मुलांसाठी १ शिक्षक
  • पुढील शिक्षणासाठी इंग्रजीची पूर्वतयारी
  • मुलांसाठी आणि पालकांसाठी वाचनालय