संस्थापक सदस्य व मार्गदर्शक
निर्मला पोतनीस
B.Com
संगीत विशारद
निमाताई भाषेच्या अध्यापनात वेगवेगळे प्रयोग करतात.गाणी, नाटुकली यांची विपुल निर्मिती, पालक-शिक्षकांसाठी नाट्यलेखन करतात.ओरिगामीचा छंद जोपासला आहे.
सुचिता पडळकर
M.A.
राज्यशास्त्र
मुलांच्या शिक्षणाबद्दल यांना अत्यंत कळवळा अहे. ‘शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी’ या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञानात रस निर्माण होईल असे प्रयोग मुलांसाठी करतात. बौद्धिक खेळ घेण्याची आवड.
किशोरी सबनीस
B.Com
किशोरीताई फुलोराच्या ‘perfectionist’ म्हणून ओळखल्या जतात. कोणतंही काम सुबक, नीटनेटकं, अत्यंत सौंदर्यपूर्ण असते. हस्तकलेतल्या अनेक प्रकारात निपुण आहेत.चित्रकला, भरतकामातून निर्मितीचा छंद जपला आहे.
गार्गी भांडारी
M.A.
Sociology
सध्या नाशिक येथे स्थित. पेंटिंग, भरतकाम, पॅचवर्क याचा उपयोग करून बॅग्ज, ड्रेसमटेरीअल, बेडशीट बनविण्याचा छोटा व्यवसाय सुरु आहे.
गौरी प्रसादे
वाचनालय प्रमुख
गौरीताई पालक म्हणून फुलोरा कुटुंबात आल्या आणि पुढं शिक्षक झाल्या. वाचनाची आवड आहे. वाचनालयाचं काम गेली अनेक वर्ष सांभाळत आहेत. यांना गाण्याचा छंद आहे.
आमचे शिक्षक
शामली यादव
बालवाडी प्रशिक्षित
शामलीताई वेगवेगळ्या कामांची जबाबदारी मनापासून घेतात. कायम उत्साही असतात.
नंदिनी पाटील
बालवाडी प्रशिक्षित
नंदिनीताई इंग्रजी अध्यापनात नवनवे प्रयोग करतात. शिकवण्यात जुन्या – नव्याचा चांगला मेळ घालतात.
सानिका तासे
बालवाडी प्रशिक्षित
सानिकाताई मुलांमध्ये छान रमतात. गाणी, गोष्टी, खेळ घेण्याची आवड आहे.
स्वाती सु. जामसांडेकर
B.B.A
स्वातीताई पालक म्हणून फुलोरात आल्या. त्यांची मुलगी पहिलीत गेल्यावर त्या शिक्षक म्हणून शिशुगटावर काम करत आहेत.
शिल्पा कुलकर्णी
B.Com
शिल्पाताई मराठी भाषेचे अध्यापन करतात. कलात्मक कामं विशेष चांगली करतात.बालवाडी प्रशिक्षित, स्पेशल एज्युकेटर म्हणून या काम करतात.
आर्या (भानू) देशपांडे
B.D.F.C
हरहुन्नरी, उत्साही सर्व कलांमध्ये गती असणाऱ्या ताई आहेत.
उषा देशपांडे
BCA
माजी पालक त्यांची तिन्ही मुले फुलोरात शिकलीत. हस्तकला उत्तम. जास्त न बोलता काम करत राहतात.
मानसी बेरी
B.A with Art & Painting
२०१९ मध्ये फुलोरा कुटूंबात आल्या आणि लगेच रुळल्याही.